डाएटिंग करताना हे लक्षात ठेवा

आरोग्य ज्ञान

कित्येक वेळ आपण  डाएटिंग  करतो; परंतु आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा आपले खाण्यावर नियंत्रण राहत नाही. यामुळे डाएटिंग  करूनही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोन उपाय केले जाऊ शकतात. पहिला उपाय म्हणजे  डाएटिंग  आणि दुसरा क्रॅश डाएटिंग परंतु या उपायांचा अवलंब अशा प्रकारे करू नये कि, स्वास्थ्य सुधारण्याऐवजी खराब होईल आणि आजारांना  सामोरे जावे लागेल. म्हणूनच या उपायांचा अवलंब करताना योग्य चिकित्सकाचा  सल्ला अवश्य घ्यावा. आपल्या शरीराचे वजन एका दिवसात कमी होत नाही, यासाठी संयम ठेवावा. रिसर्चमधून सांगितले जाते कि, जर काही किलोंचे वजन कमी करावयाचे असेल तर अशा पदार्थाच्या खाण्यामध्ये कपात करावी,  ज्यामध्ये कॅलरीज  अधिक आहेत.

डाएटिंग  करताना हे लक्षात ठेवा
डाएटिंग करताना हे लक्षात ठेवा

जसे केक, पेस्ट्री, तळलेला नाश्ता, मैदयापासून बनविलेले पदार्थ, साखर, लोणी आणि क्रीम इयादी. तसेच फळांचा रस पिण्याऐवजी अखंड फळे खावीत.
कारण फळांच्या रसामध्ये शुगरची मात्र अधिक असते आणि फायबर्स कमी असतात. फायबरयुक्त फळे आणि भाज्या शरीरासाठी चांगले ठरतात. भात, ब्रेड, विनातेल खाल्ले जाऊ शकतात. कच्च्या भाज्याही खाल्ल्या जाऊ शकतात कोणतेच नुकसान नाही. सॅलड  आणि सूपसुद्धा शरीर आणि आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहेत.

डाएटिंगदरम्यान दुध आणि दही, दोन्हींचे सेवन करावे; परंतु ध्यान राखावे कि, हे मलईयुक्त नसावे. डाएटिंग  करण्याने स्न्यायु ढिल्ले पडतात, यासाठी व्यायाम करणे जरुरी आहे. याने त्वचा चमकदार राहते डाएटिंगच्या दरम्यान छोटे-छोटे  त्रासही उत्पन्न होऊ शकतात. डाएटिंगच्या  सुरुवातीला डोकेदुखीही होऊ शकते. अधिक वेळ रिकाम्यापोटी राहण्याने पोटदुखीही होऊ लागते आणि असिडिटीचीही तक्रार होऊ शकते म्हणूनच डाएटिंग करण्यादरम्यान डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply