मसाल्याच्या पदार्थांचे औषधी गुणधर्म

आरोग्य ज्ञान, पाककला

मसाल्याचे पदार्थ, भारतीय  खाद्यसंकृतीतील एक अविभाज्य घटक. स्वयंपाकघरातील  एक अत्यावशक भाग. खाद्यपदार्थ स्वादिष्ट आणि चटपटीत बनवणे हे तर मसाल्याच्या पदार्थाचे मुख्य काम. त्यासाठी ते संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत.  मसाल्याच्या पदार्थामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

मसाल्याच्या पदार्थांचे औषधी गुणधर्म
मसाल्याच्या पदार्थांचे औषधी गुणधर्म

हिंग :
दातदुखी बरी करणे, अपचन दूर करणे आणि पोटदुखीवरही हिंग गुणकारी आहे. वाटलेला हिंग गरम पाण्याबरोबर दिवसातून एक- दोन वेळा घेतल्याने अपचन दूर होते.
मात्र दिवसभरात १ किंवा २ ग्रॅमपेक्षा अधिक हिंग घेवू नये. अर्धा ग्रॅम वाटलेला हिंग दुखणारा दात व  हिरडीला लावला तर वेदना कमी होतात.
वेलदोडे :
वेलदोड्यात पोटाचे, गॅसचे विकार बरे करण्याचा गुण आहे. ४-५ वेलदोडे वाटून दिवसातून तीन-चार वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावेत. वेलदोडा  तोंडात धरल्याने मळमळणे बंद होते आणि उलटी होणे थांबते.
काळी मिरी :
सर्दी- पडसे आणि खोकल्यासाठी काळ्या मिरीसारखा रामबाण उपाय नाही. काळी मिरी वाटून चाहत घालून घ्यावी . थोडा गूळ, मध वा साखर मिसळावी.
लवंग :
दातदुखी आणि खोकला यासाठी लवंग फारच उपयुक्त आहे. तोंडात लवंग धरली तर गळ्याला आराम वाटतो.
लवंग वाटून चहात घालून  घेतली तरी परिणाम करते. मात्र लवंग उष्ण असल्याने, दिवसभरात १-२ ग्रॅमपेक्षा अधिक लवंगाचे सेवन करू नये.  

Leave a Reply