सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी
- कायम चेहरयावर हास्य ठेवा
- रोज सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.
- तुमच्या आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या. अगदी ऑनलाईनदेखील सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा .
- अंतर्मनाने भगवंताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
- तुम्हाला काही तरी नवीन शिकवणारे प्रेरणा देणारे वाचा .
- दिवसभर कुठल्या न कुठल्या कामात राहा .
- तुम्हाला आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात करा.
- सकाळी उठल्यावर आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या.
- भरपूर हसा.
- गरजूंना मदत करा.
- चिंता झटकून टाका.
- चांगली स्वप्ने पहा.
- अस्वस्थ गोष्टीतून स्वस्थता मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करा.
- तुम्हाला आनंद मिळवून देणारया गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
- पाळीव प्राण्यांशी खेळा.
- तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा.
- पुरेशी झोप घ्या. गरज वाटेल तेव्हा एखादी डुलकी घ्या.
- नियमित व्यायाम करा.
- स्वत:वर विश्वास ठेवा.
- उद्दिष्ट साध्य करा आणि नवीन उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामाला लागा .
- मुल्ये विसरू नका.
- रोज पाच जणांना कडकडून मिठी मारा.
- लक्ष केंद्रित करा, केंद्रित करा आणि केंद्रित करा.
- संगीत ऐका किंवा तुमची आवडती गाणी गुणगुणा.
- जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या.
- नवीन काहीतरी शिका.
- स्वत:वर भरपूर प्रेम करा.
- डोळे मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा.
- लोकांचे मनापासून कौतुक करा.
- घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.
- उत्साही रहा, चेष्टामस्करी करा.
- आव्हानांना सामोरे जा. जोखीम उचला.
- योग करा.
- स्वत:च्या महत्त्वाकांक्षांना महत्त्वा द्या. रोज त्यावर थोडेतरी काम करा.
- तुमच्या कष्टांचे तुम्ही सकारात्मक पद्धतीने कौतुक करा.
जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस (Marathi Status) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह.