अश्या प्रकारे हिरा धारण केल्याने ज्ञान, यश बुद्धीची प्राप्ती होते

फेंगशुई, शास्त्र

रत्ने व उपरत्ने  धारण केल्याने शुभता व लाभ यामध्ये त्वरित वृद्धी होते. हि रत्ने नवग्रहबाधा, दारिद्रयनाश, विषबाधा व पापसंतापनाश  यासाठी उपयोगी पडतात.
तसेच काविळ,प्रमेह, मुळव्याध,श्वासविकार, ज्वर, मूत्र दाह, व व्रण यावरील उपचारात हि रत्ने उपयोगी पडतात. तसेच हि रत्ने उपयोगी पडतात. तसेच हि रत्ने आयुष्य,यश, कीर्ती व पुण्यही वाढवितात.
हिरा या रत्नाबद्दल असे वर्णन आढळते कि जो हिरा गुळगुळीत, स्फटिकासारखी तेजस्वी व शंखासमान शुभ्र असेल तो ब्राह्मणवर्गीय  हिरा म्हणून ओळखावा. जो हिरा रंगाने लाल असेल तो क्षत्रिय वर्णाचा ठरतो.
काहीसा काळपट व पिवळसर आणि रक्तवर्णीय हिरा वैश्य वर्णाचा समजावा व पूर्णपणे काळ्या वर्णाचा हिरा हा शुद्र  वर्णाचा मानावा. हा हिरा अशुभ मनाला जातो.

हिरा धारण केल्याने ज्ञान, यश बुद्धीची प्राप्ती होते
हिरा धारण केल्याने ज्ञान, यश बुद्धीची प्राप्ती होते

ब्राह्मणवर्गाचा  हिरा धारण करणारया ब्राह्मणाला चारी वेदांचे अनुष्ठान करण्याचे फल प्राप्त होते. क्षत्रिय वर्णाचा हिरा धारण करण्याने महत्त्व व जय यांची प्राप्ती होते . बुद्धिमान, चतुर व धनाचा संचय करणारया व्यक्तींनी वैश्य वर्णाचा हिरा धारण करणे योग्य ठरते. स्वबळावर उदरनिर्वाहासाठी धन कमाविणाऱ्या, साधू स्वभावाच्या व परोपकारी व्यक्तीने शुद्र वर्णाचा हिरा धारण करावा. जो हिरा अष्टधारी असतो.
 षटकोनी व अत्यंत चमकदार असतो, तो ढग व इंद्रधनुष्याप्रमाणे  आभास उत्पन्न करतो, तसेच पाण्याची छटा असणारा असतो त्याला पुरुष हिरा म्हणतात काहीसा चपटा असणारा गोल हिरा हा स्त्रीलिंगी  हिरा ठरतो.  तर गोल : परंतु तिरपे कोपरे व वजनाने असणारया हिरयाला नपुंसक हिरा म्हणून ओळखले जाते.
हे तिन्ही प्रकारचे हिरे तिन्ही लिंगाच्या व्यक्तींची अनुक्रमे स्त्री- नपुंसक या भेदाप्रमाणे वापरणे इष्ट ठरते. पुरुषाला स्त्रीलिंगी , तर स्त्रीला नपुंसक हिरा धारण करण्याने लाभ होत नाही .काहीसा काळपट व पिवळसर आणि रक्तवर्णीय हिरा वैश्य वर्णाचा समजावा.

हे ही वाचा : Positive Quotes in Hindi

Leave a Reply