कसे असायला हवे लग्नानंतरचे मुलींचे आर्थिक स्वातंत्र्य ?

लाइफस्टाइल

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण  वाढले  तसे करिअर करणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे . आता मुलींच्या आयुष्यात दोन महत्वाचे टप्पे असतात एक म्हणजे करिअर आणि दुसरे लग्न .
करिअरला महत्व द्याच : मुलींनी लग्नाइतकेच करिअरला महत्व दिलेच पाहिजे. लग्न महत्वाचे असले तरी तुम्ही तुमची बनवलेली ओळख , हुद्दा थोडक्यात ‘ आयडेंटि ‘ गमावण्याची अजिबात गरज नाही. उलट तुम्ही स्वतःचे अस्तित्व टिकवून लग्नाचे नटे समृद्ध करू शकता. त्यामुळे अशाच जोडीदाराची निवड करा जो तुमची व्यक्ती म्हणून स्वतंत्र ओळख मान्य करेल .


नोकरी का घर : लग्नानंतर मुलगी वेगळ्या घरात रहायला जाते, सून म्हणून तिच्याकडून सासरच्यांच्या अपेक्षा असतात. त्यात घर म्हणून नवीन संसाराची जबाबदारी अंगावर येऊन पडते अशात नोकरी कि घर असा प्रश्न अनेक मुलींना पडतो या प्रश्नाचे उत्तर नवऱ्याकडून मागण्याची गरज नाही. म्हणजेच लग्न झाले म्हणून स्वतःचे निर्णय घेण्यासाठी नवऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. नवऱ्यासोबत चर्चा करा .
करिअरवरचा फोकस हळू देऊ नका : लग्न हा महत्वाचा टप्पा असला, तरी तुमचा करिअरचा फोकस हळू देऊ नका. तुम्ही जो पर्यंत तुमच्या करिअरला महत्व देत नाही तो पर्यंत तुमचा नवरा , तुमच्यावर कितीही प्रेम करत असला तरी देखील तुम्ही तुमचे करिअर जोपर्यंत गांभीर्याने घेत नाही तो पर्यंत बाकीच्यांसाठी देखील ती गोष्ट महत्वाची आणि आदराची ठरत नाही .
आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचे : लग्न करून श्रीमंत  घरात गेलात तरी तुम्ही पैसे कमवाच. परिस्थिती कधी बदलेले सांगता येत नाही. जर पुढे लग्नच संबंध ताणले गेले तुम्हाला  वेगळे होण्यासारखी परिस्थिती तयार झाली तर हेच करिअर , तुमची नोकरी तुम्हाला भक्कम आर्थिक पाठिंबा देते .

Leave a Reply