पावसाळ्यात मेकअप कसा ? पावसाने खराब होऊ नये असा
एखादी चांगली गोष्टही चुकीच्या वेळी केली ,तर तिचा चांगुलपणा वाया जातो हे तर सत्य आहे आणि पावसाळ्यातील मेकअपला हे लागू आहे. त्यासाठी काही टिप्स :
- ताजा मेकअप करून घराबाहेर पडू नये. फेस पावडरचा उपयोग तर स्नानानंतर लगेच करावा.
- डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी काजळ- मस्करा वापरात असाल , तर तो पावसात दोन चार थेंबांनी बिघडून जाईल . तेव्हा वॉटरप्रूफ आयलायनरचा वापर करा वा लाईट बरो पेन्सिलचा.
- ब्लशरचा वापर करत असाल तर पावडर ब्लशरऐवजी क्रीमी ब्लशरचा वापर करा.
- लिपस्टिक फार गडद करू नये. ओठांवर लिपस्टिकचा एकाच ‘ कोट ‘ द्यावा. त्याने स्वाभाविक लालिमा दिसेल आणि पाण्यात विरघळणारही नाही.
- झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील.
- स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा स्निग्ध राहील .