जीवनात भाग्योदय कसा व केव्हा ?

वार्षिक भविष्य

व्यक्तीला जीवनात यश असेल तर जीवनात सुख, समाधान व आनंद आपोआपच निर्माण होतो ; परंतु ती जर अपयशी असेल तर मात्र, सर्व सुख, समाधान लोप पावते व जीवन निरास वाटू लागते.
यशासाठी जीवनात उर्जा आत्मविश्वास याबरोबरच  भाग्य आणि आपल्या आसपासच्या  वातावरणातील अदृश्य उर्जा शक्तींची साथ आवश्यक ठरते.
जातकाच्या जन्मकुंडलीमध्ये ज्या स्थानी धनु व वृश्चिक राशी असतील त्या स्थानातूनच धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात.
व्यक्तीने धोका पत्करला अर्थात धाडस केले तरच भाग्यही पौधे येते ; परंतु धाडसच केले नाही तर भाग्यही मागे हटते.
गुरु ग्रह सोने आहे तर मंगल पितळ. या दोन्ही  ग्रहांची जर युती असेल तर पितळ सोन्याची चमक दाबून ठेवतो व सोन्यात भेसळ झाल्याने जातकाच्या क्षमतांचे पूर्ण मूल्यमापन होत नाही.

जीवनात भाग्योदय कसा व केव्हा ?
जीवनात भाग्योदय कसा व केव्हा ?

जातक आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करू न शकल्याने त्याला त्याच्याहून कमी लायकीचे लोक ओवरटेक करून पुढे निघून जातात .
जेव्हा व्ययाच्या रुपात मंगल ग्रह व रोगाच्या रुपात शुक्र लग्नस्थानी बनणाऱ्या धनपती योगाला नष्ट करण्याचा निश्चय करतात तेव्हा पैसा देण्यापूर्वीच त्याचा निघून जाण्याचा रस्ता तयार असतो.
अशा स्थितीत जातकाने कितीही परिश्रम केले तरी त्याच्या हातात पैसा टिकत नाही मग बचतीचे नावच नको. त्यामुळे व्यक्ती आयुष्यभर दरिद्रीच राहाते. अशा अवस्थेत  एखाद्या विद्वान ज्योतीशचार्याकडून सल्ला घ्यावा व त्याच्या सल्ल्यानंतरच सव्वा सात रतीभाराचे पुष्कराज रत्न धारण करावे. रोज कपावर चंदनाचा तिला लावावा.
शुक्राचे वर्चस्व कमी करण्यासाठी महागड्या व अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळावी. खाणेपिणे, मेजवानी, पार्ट्या वं  महागड्या वस्त्रासाठी फालतू खर्च करू नये .
कुंडलीतील लग्नापासून नावं भाव हा भाग्यस्थान असतो. भाग्य स्थानापासून नववा भाव हा भाग्याचेही भाग्यस्थान अर्थात पंचम भाव असतो.
 द्वितीय. एकादश भाव हे नियंत्रक भाव आहे.  तृतीय भाव हा  पराक्रमाचा भाव आहे.

Leave a Reply