दृढ निर्धाराने आत्मनिर्भर बनणं शक्य

लाइफस्टाइल

फार  लांब जाण्याची गरज नाही. फक्त वीस वर्षापूर्वी आपलं जीवन कसं होतं याचा विचार करा. मोबाईल नव्हते. कॉम्पुटरची तोंड ओळखही झालेली नव्हती. एटीएम, मेसेज, इ-मेल या गोष्टी तेव्हा स्वप्नातही अस्तित्वात नव्हत्या. तरीही सगळ्यांच नीट चाललेलं होतं.

माणूस गुलाम बनला आहे.
मागच्या पिढीच्या तुलनेत माणसाचं जीवन सुलभ सुविधाजनक नक्कीच झालं आहे; पण त्याच बरोबर माणूस हा गुलाम बनत चालला आहे. सवयींचा गुलाम, सुविधांचा गुलाम, आत्मनिर्भरता म्हणजे काय, स्वयंभू कसं जगायचं हे माणूस विसरूनच गेला आहे. एक विचार करून बघा. मोबाईल शिवाय जगायचं आहे हे सांगून बघा. अनेकांचा जीव घाबरा होईल. मोबाईल, कॉम्पुटर, टीव्ही, डिश , फ्रीज, वाशिंग मशीन, मिक्सर ग्राईन्डर, गैस या सगळ्या गोष्टीना माणसाचं आयुष्य नक्कीच सुविधाजनक बनवल आहे यात शंका नाही; पण याच आणि अशा काही गोष्टी माणसाला पांगळं, डिपेन्डन्ट बनण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.

दृढ निर्धाराने आत्मनिर्भर बनणं शक्य
दृढ निर्धाराने आत्मनिर्भर बनणं शक्य

आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार
माणसाने सवयीच्या, वस्तूच्या इतकं अधीन होणं चांगलं आहे का? स्वत:च पुनरावलोकन करा आणि गुलामीच्या चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला रिचार्ज करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. तुमच्या लक्षात येईल कि सवयीच्या गुलामीतून बाहेर पडणं शक्य आहे.
काय करता येईल?

  • मोबाईल फास्ट म्हणजे ‘मोबाईल उपवास ‘ करा. आपला फोन नादुरुस्त झाला आहे किव्हा जवळ मोबीईलच नाही अशी कल्पना आधी फक्त २४ तासासाठी करा. सुरवातीला अस्वस्थ वाटेल तिकडे लक्ष देऊ नका. दिवसभरात खूप एनर्जी वाचली आहे आणि निराळीच शांतता मनाला मिळालेली तुम्हाला जाणवेल.
  • मोबाईल उपवास हि सुरवात झाली. आता खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनण्याची तयारी करण्याची वेळ आली आहे. यातली दुसरी गोष्ट म्हणजे वाचनाची सवय वाढवा. ऑफिसमधून घरी आल्यावर जी वेळ टीव्ही बघायची आहे त्या वेळेत टीव्ही बंद करून मनसोक्त वाचन करा. घरच्यांशी बोला. असा आनंद आधी कधी मिळाला नव्हता याची तुम्हाला जाणीव व्हायला लागेल.
  • मोबईल  उपवासाप्रमाणेच फ्रीज, वाशिंग मशीन उपवास करता येऊ शकतो.
  • आता पुढचं पाऊल. शक्यतो एक आठवडा शहरी जीवनाचा त्याग करा. शहरी जिवनासोबत ज्या सुविधा येतात त्यांचा उपभोग घेऊन नका. तब्बल आठवडाभर सुपरमार्केट, हॉटेल्स, सिनेमा, नाटक, खरेदी अशा सगळ्या सुविधांचा त्याग करा. हे एवढ्याचसाठी करायचं आहे कारण त्यामागे सवयींना गुलाम बनवण्याचा हेतू आहे.
  • आठवड्यातून एकदा नैसर्गिक आहार घ्या. शिजवू नका, हॉटेलमध्ये जाऊ नका. दुध, फळ असा आहार घ्या.
  • आत्मनिर्भराचा  निर्धार टिकवून ठेवण्यासाठी भरपूर मेडीटेशन करणं हा चांगला उपाय आहे.
  • लोकल अथवा बसने ऑफिसमध्ये जावं लागत नसेल तर एक दिवस लांबचा प्रवास असला तरी चालतच जा. या प्रवासात अनेक नव्या गोष्टींची तुम्हाला ओळख होईल.

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.

Leave a Reply