धाडसी व्हा आणी निर्णय घ्या

लाइफस्टाइल

कधीही तुमच्यासमोर समस्या उभी ठाकली तर लक्षात ठेवा, निर्णय न घेणे हीच सगळ्यात मोठी चूक असते. त्यामुळे निर्णय घ्या आणी कामाला लागा . माझ्या एक उद्योजक मित्राला गेले काही दिवस रात्री झोप लागत नव्हती . सतत विचारांनी त्याची झोप उडाली होती .
कारण त्याचा व्यवसाय डबघाईला आला होता. व्यवसाय नावारूपाला आणी भरभराटीला आणण्यासाठी त्याने खूप भांडवल घातले होते. मेहनत घेतली होती.
        आता तो बंद करणे म्हणजे प्रतिष्ठेला धक्का असे त्याला वाटत होते. काही जणांच्या मदतीने व्यवसायाला उर्जितावस्था आणता येईल असे त्याला अजूनही वाटत होते . त्याला निर्णय घेता येत नव्हता शेवटी आमची भेट झाली . मी त्याला सांगितले, निर्णय काहिधी चुकीचा नसतो. धाडस कर आणी निर्णय घे. होय किंवा नाही हाच निर्णय. निर्णय न घेणे हीच मोठी चूक असते. निर्णय न घेण्यामुळे मानसिकदृष्ट्या खचून जातो.

धाडसी व्हा आणी निर्णय घ्या
धाडसी व्हा आणी निर्णय घ्या

       दुसरया दिवशी त्याने मला फोन केला आणी सांगितले कि, त्याला रात्री चांगली झोप लागली. कारण सगळ व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्याने घेतला होता आणी आता त्याबद्दल विचार करण्याची गरज नव्हती.  दुसरा एक तरुण मित्र वेगळ्याच समस्येत अडकला होता. त्याला एक मुलगी आवडत होती आणी तिच्याशी कसे बोलायचे याची त्याला भीती वाटत होती आणी मग काय करायचे  या चिंतेत तो अडकला होता. तिच्याशी त्याची ओळख होती. तिचा फोन नंबर त्याच्याकडे होता. पण तिला कॅल  करायचे धाडस त्याच्यापाशी नव्हते आणी तो सतत तिच्याबद्दल विचार करत बसायचा.
मी उत्साहाने त्याला सांगितले कि, तू तिला फोन केला नाहीस तर तिला तू आवडतोस किंवा नाही हे तुला समजणारच नाही. मग आठवड्यानंतर त्याची भेट झाली. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते.  त्याने शेवटी तिला फोन केला होता आणी तिने त्याच्याबरोबर जेवायला जाण्याचे मान्य केले होते.  त्यामुळे कधीही तुमच्यासमोर समस्या उभी ठाकली तर  लक्षात ठेवा. निर्णय न घेणे हीच सगळ्यात मोठी चूक असते. त्यामुळे निर्णय घ्या आणी कामाला लागा .

Leave a Reply