साधू ची झोपडी-प्रेरणादायी कथा

मित्रांनो एका गाव मध्ये दोन साधू राहत होते. ते दिवसभर भिक मागत आणि मंदीरामध्य पूजा करत. एक दिवस गावांमध्ये, वादळ आल आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. दोनीं साधू गावाच्या सेमेलगतच्या झोपडी मध्ये राहत होते, संध्याकाळी दोगे घरी परत आले आणि पाहतो तर काय वादळीप-पाऊसाने त्यांची आर्धी झोपडी तुटली होती.

हे पाहून पहिला साधू रागावला आणि देवाला म्हणाला देवा तू नेहमी माझ्यासोबत चुकीच वागतोस. मी दिवसभर तूज नाव घेतो तुझी पूजा करतो ती पण तू माझी झोपडी तोडलीस. गावामध्ये जे चोर-लुटेरे, खोटे लोक आहेत त्यांच्या घराला काही नाही झालं. बिचाऱ्या साधू माणसांची झोपडी तुटली हे तुझच काम आहे देवा. आम्ही तुझ्या नावाचा जप करतो पण तू आमच्यावर प्रेंमच करत नाहीस.

यावर दूसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन नाचायला लागला आणि म्हणाला हे देवा आज माझा विश्वास बसला कि तुझ आमच्यावर किती प्रेंम आहे हि आमची आर्धी झोपडी तूच वाचवली असणार, नाहीतर एवढ्या जोरदार पाऊसात माझी पूर्ण झोपडीच उडून गेली असती हि तुझीच कृपां आहे कि आमच्याकडे अजून डोक झाकाण्यापुर्ता निवारा  आहे.

निश्चित हे मी केलेल्या पूजेच फळ आहे आणि म्हणूनच मी उद्या पासून तुझी अजून पूजा करेन कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूपच वाढला आहे. तुझ्झी सद्यव जय जय कार होवो.

मित्रांनो एकाच घटनेला एक सारख्या दोन लोकांनी किती वेगळ्या दुष्टी ने पाहिलं…

आपले विचारच आपलं भविष्य निश्चित करतात. आपल जग तेव्हाच बदलेलं जेव्हा आपले विचार बदलतील.

जर आपले विचार या गोष्टीतील पहिल्या साधू सारखे असतील तर आपल्याला नेहमीच प्रत्यक गोष्टी मध्ये काहीतरी कमी आहे याची उणीव भासेल आणि याउलट जर आपले विचार या गोष्टीतील दुसऱ्या साधू सारखे असतील तर प्रत्येक गोष्ट निश्चित चांगलीच असते याची जाणीव होईल.

शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली, तरीही या गोष्टीतील दुसऱ्या साधू प्रमाणे आपले विचार नेहमीच सकारात्मक असले पाहिजे.

Leave a Reply