योग्य दिशा

एक धन-धाकट आणि पिळदार शरीराचा पैलवान एक स्टेशन वर उतरला. त्याने टैक्सीवाल्याला विचारले मला साई बाबांच्या मंदिरात जायचा आहे.

टैक्सीवाला म्हणाला २०० रुपये लागतील. तो पैलवान म्हणाला एवड्या जवळ जायचे २०० रुपये, नको राहूदे मी माझे सामान घेऊन स्वतच जाईन.

तो पैलवान सामान घेऊन खूप दूर परियंत चालत राहिला. काही वेळाने त्याला पुन्हा तोच टैक्सीवाला दिसला, त्या पैलवानाणे टैक्सीवाल्याला विचारले कि आता तर मी अर्ध्या पेक्षा जास्त रस्ता पार केला आहे. तुम्ही आता किती पैसे घेणार?

टैक्सीवाला म्हणाला ४०० रुपये.

तो पैलवान टैक्सीवाल्याला म्हणाला आधी २०० रुपये आणि आता ४०० रुपये हे असे कसे.

टैक्सीवाला म्हणाला एवढा वेळ झाला तुम्ही साई मंदिराच्या विरुद्ध दिशेने चालत आहात. तो पैलवान काहीही न बोलता गपपणे टैक्सीत बसला.

मित्रानो, जीवनात आपण कोणतेही काम करायच्या आधी काहीही विचार न करता निर्णय घेतो आणि ते काम करण्यासाठी खूप मेहनत करतो व खूप वेळ ही वाया घालवतो आणि ते काम अर्ध्या वरच सोढून देतो. एक लक्षात ठेवा कोणतेही काम हाती घ्यायच्या आधी पूर्ण विचार करा की ते काम आपल्या जीवनातील लक्षाचा एक भाग असेल.

एल लक्षात ठेवा जर दिशा योग्य असेल तरच मेहनत सफळ होते आणि जर दिशा योग्य नसेल तर कितीही मेहनत केली तरी फळ मिळत नाही म्हणून योग्य दिशा निवडा आणि मेहनत करा यश तुमच्या हातात असेल.

Leave a Reply