५० रुपयाची नोट- प्रेरणादायी कथा

प्रेरणादायी कथा

एक वक्ती खूप उशिरा परियंत कार्यालयात काम करून घरी पोहचला. दरवाजा उघडून त्याने पहिले तर आपला ५ वर्षाचा मुलगा न झोपता त्याची वाट पाहत होता.

दरवाज्यातून आत शिरताच त्यांचा मुलगा म्हणाला — “बाबा , काय मी तुम्हांला एक प्रश्न विचारू शकतो?”

हा – हा विचार ना काय झाले. बाबा त्याला म्हणाले.

मुलगा म्हणाला बाबा तुम्ही एका तासामध्ये किती पैसे कमवता?

याच्याशी तुला काय घेणे – देणे. असे बिन कामाचे प्रश्न का विचारतोयस मला असे रागात बाबाने  त्याला खडसावले.

मुलगा – बाबा मला कृपया सांगा कि तुम्ही एका तासा मध्ये किती पैसे कमावता.

बाबा मुलाकडे रागात पाहून म्हणाले कि १०० रुपये.

“अच्छा ” मुलगा मान खाली घालून म्हणाला.बाबा काय तुम्ही मला ५० रुपये उधार देऊ शक्ता का ?”

हे ऐकताच तो व्यक्ति  रागावला आणि म्हणाला म्हणूनच तू मला मगाशी बिन कामाचा प्रश्न विचारलास की मी एका तासामध्ये किती पैसे कमवतो. कारण माझ्याकडून उधार पैसे घेऊन तू ज्याची गरज नाही अशी एखादी वस्तू किवा एखाद बिन कामाचं खेळण घेऊन येचील, ते काही नाही, तुला अजिबात एक ही पैसा मिळणार नाही चुपचाप आपल्या खोलीत जा आणि झोप व विचार कर की तू किती स्वार्थी आहेस.

मी दिवस रात्र मेहनत करतोय आणि तू आहेस की कोणत्याही बिनकामाच्या गोष्टी मध्ये पैसे वाया घालवतोस. तो व्यक्ति अजून हि रागात होता आणि  विचारात सूद्धा होता कि त्याच्या मुलांने असं करण्याची हिमंत कशी केली…

पण एक अर्धा तास झाल्यानंतर तो व्यक्ति शांत झाला आणि विचार करू लागला कि त्याच्या मुलाने खरच कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी पैसे मागितले असतील का कारण या आधी त्याने अशाप्रकारे कधीच पैसे मागितले नव्हते.

तो व्यक्ति उठून आपल्या मुलाच्या खोलीमध्ये गेला आणि म्हणाला की काय तुझी झोप लागली ?”नाही” अस उत्तरं मुलाने दीले.

व्यक्ति म्हणाला उगीचच मी तुला ओरड्लो कारण दिवसभर काम करून मी खूप दमलो होतो. मला माफ कर हे घे तुझे ५० रुपये. अस बोलत त्या व्यक्तिने आपल्या मुलाच्या हातावर ५० रूपयाची नोट ठेवली.

धन्यवाद बाबा मुलगा पैसे घेत खूष होऊन म्हणाला आणि ताड्कन उठून आपल्या कपाटाच्या दिशेने गेला,कपाटातून त्याने खूप शिक्के काढले आणि मोजू लागला.

ते पाहून तो व्यक्ति खूप रागावला आणि म्हणाला जर तुझ्याकडे अगोदरच इतके पैसे होते तर तू माझ्याकडून का मागितलेस.

मुलगा बाबांना म्हणाला माझ्याकडे पैसे कमी होते परंतु आता पूर्ण आहेत.

“बाबा आता माझ्याकडे १०० रुपये आहेत. काय मी तुमचा एक तास विकत घेऊ शकतो का ? बाबा कृपया तुम्ही हे पैसे घ्या आणि उद्या घरी लवकर या मला तुमच्या बरोबर जेवण करायचा आहे.

मित्रांनो, या वेगवान आयुष्यामध्ये आपण आपल्याला इतकं गुंतवून घेतो की जी मानस आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहेत त्या माणसांसाठी आपण नकळत वेळ काढू शकत नाही. म्हणूनच आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आई-वडील, आपली बायको, आपली मुले आणि आपले जीवाभावाचे मित्रं यांच्यासाठी नेहमी वेळ काढला पाहिजे. नाहीतर एकदिवस आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येईल की समाजायातील छोट्या मोठ्या गोष्टी कमावण्याच्या नादात आपण खूप मोठ काहीतरी गमावलं.

हे ही वाचा : FB Status in Hindi

Leave a Reply