आहारात तुपाचे महत्व

आरोग्य ज्ञान

भोजनातील पौष्टिक पदार्थामध्ये तूप फारच महत्वाचे आहे. बल, वीर्य व दीर्घायुष्य तसेच मेंदूच्या स्नायुमंडळाची शक्ती वाढवण्यासाठी तुपासारखा शक्तीदायक दुसरा पदार्थ नाही. रोजच्या जेवणात एक छटाक तूप घेतल्यास शरीरास स्निग्धता व पौष्टिक घटक पूर्णपणे मिळतात. तुपात शंभर टक्के स्निग्धता असते. प्रोभुजिनयुक्त डाळ(वरण) इत्यादी खाद्यपदार्थ तुपाबरोबर थोड्या प्रमाणत खाल्ले तरीही त्यामुळे शरीराची झीज भरून निघते. तुपावाचून प्रोटीनयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात घेतल्यास तितका लाभ देत नाहीत.

आहारात तुपाचे महत्व
आहारात तुपाचे महत्व

  तुपामध्ये पौष्टिकतेशिवाय आणखी असे वैशिष्ट आहे की, ते शरीरात उष्णता उत्पन्न करण्याचे कार्य फार चांगले करते. एक तोळा साखर खाण्यापासून जितकी उष्णता उत्पन्न होते त्याच्या अडीचपट उष्णता एक तोळा तूप खाण्याने उत्पन्न होते. यावरूनच भोजनातील तुपाचे महत्व लक्षात येईल. 

Leave a Reply