फळांचा ज्यूस – आरोग्याचा रसरशीत मार्ग

आरोग्य ज्ञान, लाइफस्टाइल

ज्यूस, फळांचा रस शरीराला पुरवतात ऊर्जा अगदी त्वरित, ज्यूस टेस्टी तर असतोच, पण स्वादाबरोबरच  तो देतो आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, आंतरिक मजबुती आणि सुधारतात
व्यक्तिमत्त्वदेखिल तेव्हा आरोग्यासाठी धरा ज्युसचा मार्ग . त्यासाठीची खास फळे व भाज्या, सफरचंद, द्राक्षे, लिंबू,कलिंगड ,संत्री, अननस, टोमाटो, मोड आलेले हरभरे इत्यादी. त्यापासून होणारे फायदे.
१) एझाइम्स : ताजी फळे आणि भाज्या म्हणजे आहेत एझाइम्सचा उत्तम स्त्रोत. एझाइम्समुळे शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात.

फळांचा ज्यूस - आरोग्याचा रसरशीत मार्ग
फळांचा ज्यूस – आरोग्याचा रसरशीत मार्ग

२) फायटो केमिकल्स : आजारपणापासून बचाव करून आपले आरोग्य सांभाळतात. फायटो  केमिकल्सचे अनेक प्रकार आहेत. एका संत्र्यामध्येच १७० प्रकारची फायटो केमिकल्स असतात.
३) सुपच्यता : ज्यूसमध्ये एझाइम्स  असल्याने ती पचनास मदत करतात. सहजपणे पचतात. शारीरिक ऊर्जा वाढवतात. या मधील ९९ टक्के पोषकद्रव्ये शरीरात शोषण केली जातात.
४) ऊर्जा : यामध्ये शर्करा भरपूर प्रमाणात असल्याने लगेच ऊर्जा देतात. ताजेतवाने करतात .
५) आम्ल-क्षार  समतोल  : बर्याचशा शारीरिक समस्या या अधिक मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ खाण्याने निर्माण होतात. अतितणावामुळेही असिडीटी वाढते; परंतु नियमितपणे फळांचा रस घेतल्याने आम्ल-क्षार समतोल राखला जातो.
६) हायद्रेशन   : ज्यूस शरीराचा डिहायद्रेशन पासून बचाव करतात.
७) ज्यूस बनविताना दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे उत्तम दर्जाची फळे आणि दुसरे म्हणजे चांगला ज्यूसर, चांगली तयार झालेली मधुर, ताजी मोसमी फळे निवडा.
८) फळे आणि भाज्यांचा ज्यूस एकाच ब्लेंडरमध्ये  काढू नये. त्याचा स्वाद बिघडतो.
९) वेगळ्या ज्युसमुळे मूत्रपिंडावर ताण पडतो म्हणून टो कमीत कमी प्रमाणात घ्यावा.
१०) फ्रीजमध्ये फार काळ टोमटो ठेवू नयेत.
११) भाज्यांचा ज्यूस देठासह  काढायचा असेल, तर देठ व पाने चिरून वेगळी करावी.
१२)  ज्युसची गोडी कमी करण्यासाठी त्यात थोडे पाणी मिसळावे.
१३) डायबिटीज वा क्रोनिक ग्लायसिमियाच्या रुग्णांनी  ज्यूस अधिक प्रमाणात घेऊ नये. त्यात ‘ शुगर ‘  वाढण्याचा संभाव असतो. 

Leave a Reply