ग्रहांचा कुप्रभाव कमी करणारी नवरत्ने

रत्ने आपल्या चमत्कारी शक्तीच्या बळावर ग्रहांचा कुप्रभाव कमी करत. नवग्रहांसाठी  ९ प्रमुख रत्ने सुनिच्छित करण्यात आले आहेत.
उदा. सूर्य  ग्रहासाठी मानील, चंद्रासाठी मोती, मंगळासाठी पोवळे, बुधासाठी पाचू, गुरुसाठी पुष्कराज, शुक्रासाठी हिरा.
शानिसाठी नीलम, राहुसाठी  गोमेद व केतुसाठी लसण्या हि रत्ने धारण केल्याने अनिष्ट ग्रहांचा  कालावधी कमी होत नसला तरी त्यांचा कुप्रभाव मात्र नक्कीच कमी होतो.

माणिक: हे सूर्य रत्न असून, हृदय व मेंदूविकार नियंत्रित करते. मुळव्याध व पित्त विकार नष्ट करते. दोन रतीभारापेक्षा जास्त वजनाचे माणिक रत्न धारण केल्याने अपस्मार ( फिट येणे ) विकार बारा होतो.
माणिक रत्न सोन्याच्या अंगठीत जडवून धारण करणे सर्वश्रेष्ट ठरते. ते चांदी व तांब्याच्या अंगठीतही धारण करता येते.
मोती : हे चंद्ररत्न  असून एक प्राणीजन्य रत्न आहे. शुभ्र पांढरा रंगाचा  स्वच्छ व स्पष्ट मोती धारण केल्याने मनामध्ये शांती व प्रेमभावनेचा संचार होतो. चंद्र हा मनाचा कारक अर्थात  स्वामी मानला जातो .
जर कोणत्याही राशीमधील चंद्र नीचेचा असला, तर अशा जातकाने उजव्या हाताच्या कनिष्ट बोटात सव्वाचार रतीभार वजनाचा मोती चांदीच्या अंगठीत जडवून धारण करणे इष्ट ठरते.

ग्रहांचा कुप्रभाव कमी करणारी नवरत्ने
ग्रहांचा कुप्रभाव कमी करणारी नवरत्ने

पोवळे : हे रत्न स्वच्छ व स्पष्ट दिसणारे असते. पोवळाच्या खड्यात दोन रंगाच्या छटा नसाव्यात. हा लाल व नारंगी रंगात उपलब्ध आहे. पोवळे हे रत्न शरीरातील रक्त, मज्जा, साहस, पराक्रम व शौर्य भाव जागृत करते.
ज्या जातकांच्या कुंडलीत क्षीण मंगल व मंगळदोष असेल, त्यांनी पोवळे रत्न धारण केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय होते.
सव्वाचार ते सव्वापाच रती भार वजनाचे पोवळे रत्न सुवर्णजडीत अंगठीत विधीपूर्वक जडवून ते उजव्या हाताच्या बोटात धारण करावे. पोवळे रत्न वजनाने हलके असते.
पाचू: पाचू हे मनमोहक रंगाचे रत्न आहे. कधीही दोन रंगाच्या छटा असणारे पाचू रत्न खरेदी करू नये.  दोषयुक्त पाचू कोणताही लाभ देऊ शकत नाही . सव्वाचार रती भाराचे पाचू रत्न  धारण करण्याने व्यापारातील लाभ वाढतो.
नोकरीत बढती मिळते. शुभ भावाचा स्थायी असणारा बुध ग्रह प्रबळ बनवून अनुकूल होण्यासाठी सोन्याच्या अंगठीत पाचू रत्न जडवून उजव्या हाताच्या कनिष्ट बोटात धारण करावे.
पुष्कराज: हे गुरुरत्न असून पिवळ्या कण्हेरीच्या फुलाचे पुष्कराज रत्न सर्वोत्तम मानले जाते. हे तेजस्वी व आकर्षक रत्न आहे :
परंतु दोषयुक्त डाग असणारे व खंडित पुष्कराज हनिकारकही  ठरतो. म्हणूनच स्थूल व वजनदार पुष्कराज रत्नाच धारण करणे  इष्ट  ठरते.
हिरा : वैभव, सुख, शृंगार, कला यांच्या प्रतिक असणारा हिरा पलटीनम वा चांदीच्या अंगठीत जडवून धारण करावा. हिरा हे जगातील सर्वात कठीण/कठोरतम  खनिज आहे.
त्यातून इंद्रधनुषी किरणे बाहेर पडतात. शुक्र शांतीसाठी वा शुक्राचा प्रभाव वाढविण्यासाठी कमीत कमी एक रती भार वजनाचा हिरा धारण करावा. तुल व वृषभ राशीच्या व्यक्तींनी हिरा रत्न धारण करणे इष्ट ठरते.
नीलम : नीलम हे शानिरत्न असून, त्यात शनीसारखेच गुण आहेत. ते जर लाभले तर रंकाचा राजा होतो; परंतु लाभले नाही राजाचा रंकही बनू शकतो.
सव्वाचार रतीभार ते सव्वाआठ रतीभाराचे नीलम रत्न  सोन्याच्या अंगठीत जडवून प्राणप्रतिष्टा केल्यानंतर धारण करावे.
गोमेद:  गोमुत्राच्या रंगाचे हे राहू रत्न. राहूच्या अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी सोने, चांदी, तांबे, लोखंडी अंगठीत जडवून विधिवत प्राणप्रतिष्टा केल्यानंतर धारण करावे.
लसण्या : मांजराच्या डोल्यासारखे दिसणारे हे रत्न केतुरत्न मानले जाते. भुरका , हिरव्या छटेचे  हे रत्न फार आकर्षक दिसते. त्यात पांढऱ्या रेषाही आढळतात.
अशुभ केतूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी तसेच शुभ केतूचा प्रभाव वाढविण्यासाठी सव्वाचार ते सव्वानऊ  रती भार वजनाचे लसण्या रत्न चांदी, तांबे, सोन्याच्या मिश्र धातूच्या अंगठीत जडवून धारण करावे.

Leave a Reply