कोणावरही व्यवस्थित पारखूनच विश्वास ठेवा

लाइफस्टाइल

बरेचजण इतरांशी बोलताना डोळ्यांकडे पाहात नाहीत. कदाचित ते लाजाळू वा आत्मविश्वासहीन असू शकतात;
परंतु एखादी व्यक्ती आपल्या डोळ्याकडे पाहून बोलत नसेल तर त्याचा अर्थ ती व्यक्ती आपल्या बोलण्यात रस घेत नाही असा होतो , अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नये.  आपल्याशी बोलताना जर एखाद्या व्यक्तीचे हावभाव व्यवस्थित नसतील तर त्याला आपल्याशी बोलताना कम्फट्रेबल वाटत नाही असे समजावे. वारंवार बैठक बदलून बसणेही याचेच द्योतक असते. एखादा जर पाय व हात क्रॉस करून बसला असेल व आपले बोलणे लक्षपूर्वक व दक्षतेने ऐकत असेल तर आपण विश्वासाने आपले विचार त्याला सांगू शकता;  परंतु तो जर पाय हलवत असेल वा वारंवार इकडे-तिकडे पाहात असेल तर त्याला आपल्या बोलण्याशी काहीच देणे-घेणे नसते. त्यामुळे त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नसतो.

कोणावरही व्यवस्थित पारखूनच विश्वास ठेवा
कोणावरही व्यवस्थित पारखूनच विश्वास ठेवा

      आपले विचार सकारात्मक असोत वा नकारात्मक जो ते समजून घेतो व त्यांचा मन राखतो. त्याच्याशीच बोलावे. प्रत्येकाला पुरेपूर अधिकार असतो . हे त्याला समजत नसते त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नसतो. एखादी व्यक्ती तिला आपल्याकडून जेव्हा काही हवे असेल तेव्हाच बोलत असेल तिच्यावर कधीही विसंबू नये, ती केव्हाही स्वत:च्या फायद्यासाठी धोका देऊ  शकते.  जर एखादी व्यक्ती स्वत:कमी बोलत असेल व आपले म्हणणे जास्त ऐकत असेल तर ती आपल्याबद्दल स्वत:चा विश्वास दाखवत आहे असा अर्थ आहे. यावरून त्याला आपले बोलणे आवडते व तो आपला आदर करतो आहे हेही स्पष्ट होते. जर आपण स्वत:ला हसतमुख, आनंदी  दर्शविण्याचा  प्रयत्न करीत असाल तर प्रथम ज्याच्यासमोर हे करीत आहात तो माणूस विश्वास करण्यालायक आहे का हे अवश्य पाहा.अन्यथा तो  इतरांसमोर आपली टर उडवीत राहील.
     आपण ज्यांच्या वर विश्वास ठेवता त्यांच्याशी खासगी गोष्टी बोलाव्यात. त्यांच्याशी आपल्या कोणत्याही समस्येवर बोलावे.अगदी आपल्या खर्च  संपत्तीबाबतही; परंतु या गोष्टी विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तींशी अजिबात बोलू नयेत. एखाद्याला आपली खासगी गोष्ट सांगितल्यावर  ती  आपल्याला दुसरया व्यक्तीकडून ऐकायला मिळाली टर पहिल्या व्यक्तीपासून सावध राहावे .जर ती त्याने कोणाला सांगितली नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. जी व्यक्ती पुढे झुकून जमिनीवर पायाचे  पंजे टेकवून आपले म्हणणे ऐकत असेल, डोळ्यांना डोळे भिडवत असेल , दोन्ही हात मांडीवर  ठेवत असेल, आपल्या प्रश्नांची  योग्य उत्तरे देत असेल ती विश्वासपात्र असते.
जे नेहमी आपल्या खासगी आयुष्याबद्दलच  बोलत असतात ते विश्वासपात्र नसतात, पण जे स्वत:च्या खासगी  जीवनाविषयी आपल्याशी बोलतात त्यांच्याशी आपण विश्वासाचे बोलू शकता.
जे इतरांची सीक्रेट्स आपल्याला सांगतात त्यांच्यावर  कधीही विश्वास ठेवू नये कारण ते आपल्या गोष्टीही इतरांना सांगू शकतात.
जे आपली केयर करत. प्रत्येक संकट, समस्यात आपली मदत करतात, ते विश्वासपात्र असतात. या माणसांना स्वत:पेक्षा शेजाऱ्यांची जास्त चिंता असते.  

Leave a Reply