फिट राहण्यासाठी या वाईट सवयी सोडा

लाइफस्टाइल

आरोग्याच्या दृष्टीने लोक घरी खूपच कटाक्षाने आरोग्याचे नियम पाळतात परंतु; ऑफिसमध्ये मात्र, आरोग्याशी खेळत असतात. सकाळचा नाश्ता णा करणे व वारंवार कॉफी पिणे यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देतात. जर आपण ऑफिसमध्ये आरोग्य जपाल तर जीवघेण्या आजारांपासून तसेच स्थुलतेपासून दूर राहू शकतात .

नका करू या चुका
नाश्ता न करणे:
आपण नाश्ता न  करण्याचा दोष ऑफिसच्या माथी मारत असतो. बरेचजण ऑफिसमध्ये लवकर जायचे म्हणून नाश्ता टाळतात. यामुळे आपण लंचटाइम पर्यंत खूप भुकेले राहतो आणि एकाच वेळी भरपेट खाण्यामुळे स्थूलता वाढते.

 फिट राहण्यासाठी या वाईट सवयी सोडा
फिट राहण्यासाठी या वाईट सवयी सोडा

सीटवर खाणे :
काही वेळेला हॉटेलातील स्नॅक्स आणून आपल्याच सीटवर खालला जातो तेव्हा तो एक तर खूप तळलेला असतो वा जास्त खारट असतो. असा आहार आपल्याला नेहमी सोबत फळांनी व भाज्यांनी भरलेला बॉक्स  ठेवावा व भूक लागल्यास ते खाणे खाल्ल्यानंतर  ऑफिसमध्येच थोडे फिरावे, खाल्लेले  व्यवस्थित पचेल .

उशिरा लंच :
प्रत्येक जेवणाची एक वेळ असते ; पण ऑफिसमध्ये आपल्या खायच्या सवयी पार बदलून जातात. जर वेळेवर जेवला नाही तर दिवसभर पोट जड वाटेल.  यामुळे मेटाबालिजम  मंदावेल व स्थुलता वाढेल. यासाठी घरी ऑफिसमध्ये आपल्या जेवणाच्या वेळा पाळा.

कॉफी ब्रेक :
जादा कॉफी ब्रेक  म्हणजे जास्त कॉफीचे सेवन. जर आपण रोज खूप कॉफी प्याल तर दिवसभरात १०० कॅलरी ग्रहण कराल. तसेच जास्त कॉफी प्यायल्यामुळे झोपही येत नाही. त्यामुळे सकाळी उशिरा उठाल व नाश्त्याला सुट्टी द्याल.

बाहेरचे खाणे
काहीजण ऑफिसमध्ये लंच घेऊन येत नाहीत . कारण त्यांना ते विचित्र वाटते; पण रोज-रोज बाहेरचे जेवणे म्हणजे अस्वच्छ व जास्त कॅलरीयुक्त आहाराला आमंत्रण देणे असते.

Leave a Reply