आहार केव्हा, कसा, किती ?

आरोग्य ज्ञान

आपण जो आहार घेतो, तो आपल्या शरीराला किती लाभदायक आहे हे आपल्या सवयींवर , समजूतदारपणावर अवलंबून असते. आपण भोजन किती वेळा, काय घेतो ?
दोन भोजनात अंतर किती ? सकाळचा नाष्टा काय ? रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असते.

आहार केव्हा, कसा, किती ?
आहार केव्हा, कसा, किती ?

१) पाहिजे भोजन पचल्यानंतर दुसरे घ्यावे. सकाळच्या भोजनानंतर अपचन झाल्यासारखे वाटले तर रात्री हलका आहार घ्यावा ; पण रात्रीच्या भोजनानंतर सकाळी अपचन वाटले , तर मुळीच भोजन करू नये.
२) भूक लागल्यावर पाणी पिऊ नये व तहान लागल्यावर जेवू नये.
३) सर्व कामे बाजूला ठेवून वेळेवर भोजन करावे.
४) जेवल्यानंतर रागावू नये आणि व्यायामही करू नये.
५) भोजन करताना प्रथम गोड. मध्ये नमकीन व शेवटी तिखट पदार्थ खावेत.
६) शिळे, कच्चे , करपलेले व थंड अन्न आरोग्याला हितकर नाही .
७) भोजनात दुध, दही, ताक आदींचा समावेश हितकर असतो.
८) रात्री भोजनानंतर दुध अमृतासमान असते.
९) भोजनानंतर फळे वा सलाड जरूर खावे.
१०) रात्रीच्या भोजनानंतर किमान दोन तास झोपू नये.

जर आपण पण फेसबुकव्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस (Marathi Status) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह.

Leave a Reply