कापुस खा आणि बारीक व्हा! पण या डाएटमध्ये फारसा अर्थ नाही

लाइफस्टाइल

तरुण पिढी मधे सध्या हे डाएट लोकप्रिय आहे. कापुस ‘ सिंथेटिक ‘ असेल तर ते आतड्यांना घातक असतं. योग्य  आहार व नियमित व्यायाम हाच बारीक होण्याचा सुरक्षित मार्ग आहे.

पैसा आणि प्रेम /सेक्स यांच्यापेक्षा आजची तरुण पिढी बारीक राहण्याला जास्त महत्व देते. स्लिम आणि फिट राहण्याचं हे फॅड भलत्याच थराला पोहोचलं आहे. त्याचा कळस म्हणजे ‘ कॉटनवूल डाएट’यात लोक कापसाचे बोळे फळांच्या एखाद्या ज्यूसमध्ये बुडवून खातात !आता बोला! युरोपमधलं हे लेटेस्ट डाएट आहे. याआधी आइस  डाएट म्हणजे बर्फाच्या क्युब्ज खाण्याचं डाएट  होतं. त्याची जागा आता कॉटन किंवा कॉटनवूल डाएटनं घेतली आहे.

कापुस खा आणि बारीक व्हा!
कापुस खा आणि बारीक व्हा!

कोणत्याही द्रवपदार्थात बुडवून खाणं म्हणजे कॉटनवूल डाएट ! पाच-सहा कापसाच्या  बोळ्यामध्ये बहुतेक जणांच पोट भरतं. शरीरालादेखील भूक भागल्यांच (कृत्रिम) समाधान लाभतं. मग चार-पाच पदार्थ असलेल्या जेवणाची गरज त्याला भासत नाही. वैधकीय संशोधकांनी मात्र या अघोरी डाएटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या ‘ National Eating Disorders’ असोसिएशनचे अध्यक्ष लीन ग्रेफ यांच्या म्हणण्याप्रमाणे, मॉडलिंग करणाऱ्या तरुणी गेल्या कित्येक वर्षापासून हेच डाएट करत आहेत. आता सर्वसामान्य स्त्रियादेखील हे डाएट करू लागल्या आहेत. या डाएटमुळे सडपातळ झालेल्या देह्लतेचं फेसबुक वर प्रदर्शन करत आहेत

Leave a Reply