इच्छा, कामना, वासना हेच माणसाच्या दु:खाचे कारण

लाइफस्टाइल

माणसाच्या दु:खाचे संतापाचे, त्रासाचे आणि दुर्गतीचे कारण कामना, इच्छा, वासना हेच आहे. इच्छा पूर्ण झाल्या तर माणसाला सुख वाटते याउलट इच्छा पूर्ण न झाल्यास दु:ख होते. इच्छेमध्ये अडसर निर्माण झाल्यास क्रोधाची उत्पत्ती होते असते.
जर एखादी व्यक्ती रंगीत असेल तर तिच्यामध्ये इच्छा दबून पडलेल्या असतात. सत्संगाशी, सेवेशी, परोपकाराशी इच्छांचा संबंध असतो .
कर्मयोगी इतरांच्या इच्छा पूर्ण करून, सेवा करून, त्यांना सुख देऊन आपल्या इच्छांपासून विरक्त होत जात असतो.

इच्छा, कामना, वासना हेच माणसाच्या दु:खाचे कारण
इच्छा, कामना, वासना हेच माणसाच्या दु:खाचे कारण

जो इतरांच्या शास्त्रोचीत इच्छा पूर्ण करतो त्याला स्वत:च्या इच्छापायी दु:खी व्हावे लागत नाही.
ज्ञानयोगी इच्छांचे कारण असलेले अज्ञान नष्ट करून इच्छाविरहित होत असतो . इच्छेची दोन कारणे आहेत.
 एक तर पूर्वजन्माचे अंतर्मनात पडून राहिलेले संस्कार जे वरचेवर प्रकट होत राहतात व त्यामधून इच्छा, वासना उत्पन्न होत राहतात.
या इच्छा पूर्वजन्मातील भोगांचे संस्कार असतात. दुसरे कारण म्हणजे जेव्हा वर्तमानात एखादी वस्तू व्यक्ती पाहून त्याला आपण महत्त्व देतो तेव्हा त्याची इच्छा निर्माण होते.

याचे मूळ कारण देहाभिमान हे आहे. कोणत्याही कारणाने इच्छा उत्पन्न झाल्यानंतर साधकाने विवेकपूर्वक तिचे परिणाम पाहायला हवेत. इच्छांचा त्याग करणे अवघड असले तरी अशक्य नाही.

Leave a Reply