स्वयं स्तन परीक्षण कसे करावे?

आरोग्य ज्ञान

महिलांमध्ये स्तन कॅन्सिरच्या केसेस वाढत आहेत. हा खतरनाक आजार शहरी महिलांना अधिक कचाट्यात घेत आहे. अशात महिला स्वयं स्तन परीक्षण करून सुरुवातीलाच हा रोग ओळखू शकतात, तर पाहूया स्वयं स्तन परीक्षण कसे करावे?

१) दोन्ही हात शरीराच्या बाजूने ठेवून आरशासमोर सरळ उभे राहावे आणि आपले स्तन लक्षपूर्वक पहावेत की, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव दिसून येतो का? स्तनांच्या त्वचेवर एखादी जखमतर नाही, तसेच निप्पल आतील बाजूस गेले आहेत का? यानंतर आपले दोन्ही हात वर उचलावेत आणि पुन्हा हे सर्व पॉइट्स लक्षात ठेवून निरक्षण करावे.

स्वयं स्तन परीक्षण कसे करावे?
स्वयं स्तन परीक्षण कसे करावे?

 

२) आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवून आतल्या बाजूस दाबावेत. जेणेकरून छातीचे मांस उभारून येईल. अशा वेळी पुन्हा स्तन आणि निप्पलचे परीक्षण करावे.
३) आपल्या बगलेमध्ये गाठीचे निरक्षण करावे आता पलंगावर सरळ झोपावे आणि ज्या बाजूचे परीक्षण करावयाचे असेल त्या बाजूच्या खाली टॉवेल मुडपून ठेवावा.
४) उजव्या बाजूच्या स्तनाचे परीक्षण डाव्या हाताने व डाव्या बाजूच्या स्तनाचे परीक्षण उजव्या हाताने करावे. आपल्या हाताच्या मधल्या तीन बोटांच्या मध्य भागाने परीक्षण करावे. हळू हळू; परंतु थोडेसे काठीणपणे गोलाकार पद्धतीने आपले हात फिरवावेत. यासाठी गळ्याच्या हाडापासून सुरवात करावी आणि स्तनांच्या खाली दोन बोटांच्या अंतरापर्यंत करावे. शरीराच्या ज्या भागाचे परीक्षण करीत असाल त्या बाजूचा हात डोक्याखाली ठेवावा.

५) एखादी गाठ असेल, तर हे नोट करावे की, गाठ स्तनांच्या कोणत्या भागात आहे? स्तनांतील गाठ निर्देशित करण्यासाठी स्तनांचे पाच भागात विभाजन करण्यात आले आहे. आता हात खाली आणावेत आणि पुन्हा स्तन आणि बगलेतील गाठीसाठी परीक्षण करावे.

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट Love Quotes in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल.

जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status संग्रह आपल्यासाठी आहे. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट Marathi Love Status संग्रह.

Leave a Reply