स्वच्छता सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ करते.

लाइफस्टाइल

सफाई व स्वच्छता या गोष्ठी फार महत्त्वाच्या आहेत.

स्वच्छता व साफसफाईमुळे घर व ऑफिसमधील सौंदर्यात भर तर पडतेच; परंतु वास्तुशास्त्रानुसारहीया गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
घर असो वा ऑफिस जर तेथे साफसफाई व स्वच्छता नसेल, तर महागात महाग वस्तू वापरून केलेली सजावटही फिकी पडते. खरोखरच सफाई व स्वच्छता या गोष्ठी फार महत्त्वाच्या आहेत. वास्तुशास्त्रातही या गोष्ठी अतिसंवेदनशीलकारक म्हणून मानल्या जातात. वास्तुशास्त्रामध्ये साफसफाई व नीटनेटकेपणावर खास भर देण्यात आले आहे. यातील काही महत्त्वाचे नियम असे आहेत.

स्वच्छता सकारात्मक ऊर्जेमध्ये बाध वाढ करते.
स्वच्छता सकारात्मक ऊर्जेमध्ये बाध वाढ करते.

१) घरामध्ये मोडक्या, तोडक्या,व फुटक्या व टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. रिकाम्या बाटल्या, डबे, तडा गेलेल्या काचेच्या वस्तू, जुनाट निरुपयोगी टायर्स, मोडक्या मूर्ती, नादुरुस्त घड्याळे इत्यादी वस्तू साफसफाईच्या वेळी एक तर फेकून द्याव्यात नाहीतर भंगारात विकून टाकाव्यात.

२) घरामध्ये काही काळासाठी अशा वस्तू ठेवायच्या असतील तर त्या घराच्या दक्षिण व पश्चिम बाजूच्या भागातच ठेवाव्यात.

३) घरातील साफसफाई व स्वच्छता करताना जुने कपडे, भांडी व बुट-चपला यासारख्या वस्तू गरीब व गरजू लोकांना देत रहा. त्यामुळे घरही स्वच्छही राहील व त्यांचे आशीर्वादही मिळतील.
४) बर्‍याचदा अनावश्यक व गरजेपेक्षा जास्त शोपीसेस व कपडे खरेदी केले जातात; परंतु त्यांची निगा ठेवली ठेवली जात नाही. यामुळेही घरात नकारात्मक ऊर्जेत वाढ होते.
५) घरातील प्रत्येक वस्तू नीटनेटकी व सजवून ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार  होतो.
६) बेडरूममधील कपात व कॅबिनेट यांचे दरवाजे नेहमी बंद  ठेवावेत. उघडे कपात हे मनात तणाव निर्माण करणारी नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
७) शिकणार्‍या मुलांच्या स्टडी टेबलच्या ड्रॉवर्सची नेहमी तपासणी करावी. त्यातील निरुपयोगी पेन फेकून द्यावेत.
८) स्टडी रूम वा लायब्ररीमधील पुस्तके नीट आवरून व्यवस्थित ठेवावीत. त्यामुळे वाचनात गोडी उत्पन्न होते व  सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
हे ही वाचा : Motivational Quotes in Hindi

Leave a Reply