भोजनाबबत लक्षात घेण्यासारखे !

आरोग्य ज्ञान

एकदा केलेले पूर्ण भोजन पचण्यास साधारणत: आठ तास लागतात. म्हणून दोन जेवणामध्ये आठ तासांचे अंतर ठेवावे. आपल्याकडील हवापाण्याचाविचार केल्यास विद्यार्थीदशेत तीन वेळ, तारुण्यावस्थेत दोन वेळ व वृद्धापकाळी एक वेळ भोजन करावे. भोजनाची वेळ आपला कामधंदा पाहून निश्चित करावी. दिवसातून अनेकदा खाण्याची सवय चांगली नाही.

भोजनाबबत लक्षात घेण्यासारखे !
भोजनाबबत लक्षात घेण्यासारखे !

नित्य- नियमित वेळ जेवण करण्याची सवय ठेवावी. त्याने अन्नाचे नित पचन होऊन ठरल्यावेळी आपोआप भूक लागते. ठरलेल्या वेळेपूर्वी किंवा उशिरा भोजन केल्यास अनेक विकार होतात.
आयुर्वेदात हितकार भोजनाला हितशन, नियमित वेळी केलेल्या भोजनास नियतशान व उचित प्रमाणात केलेल्या भोजनास मिताशान म्हणतात. तसेच असात्म्य भोजनाला अहिताशन , अवेळी खाण्याला विषमाशन व अधिक भोजनाला ( एकवार एक खाणे ) अध्यशन म्हणतात जेवताना हे सर्व लक्षात असू द्यावे.

Leave a Reply