जर समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात

लाइफस्टाइल

तुमच्या आजूबाजूला घडणारया प्रत्येक घटनेमुळे तुमचे लक्ष विचलित होत असेल आपल्यासाठी काय महत्वाचे आहे, हि बाब तुम्ही सहजपणे विसरून जाता. सतत लक्ष विचलित होण्यामुळे आपण अनेकदा मूळ ध्येयापासून, कामापासून दूर जाण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी काही टिप्स .
१) तुम्ही तुमचे मित्र- मैत्रिणी, सहकाऱ्यांमध्ये गुरफटून जात असाल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही थोडे थांबून शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आज मित्र, सहकारी म्हणून ज्यांना तुम्ही आपले मानले आहे किंवा गृहीत धरले आहे ती मंडळी उद्या तुम्हाला त्यांची जेव्हा खरच गरज असेल तेव्हा गायब झालेली असतील.

जर समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात
जर समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात

२) सदैव  सावध राहून अनावश्यक समस्या टाळणे हिताचे ठरते. नात्यांमध्ये गैरसमज होण्याची चिन्हे दिसू लागली कि सावध व्हा. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमची मदत घेऊन किंवा स्वच्छ शब्दात त्यांच्या हितासाठी तुमचा वापर करून गायब होण्याच्या तयारीत असतात. माणसे पारखण्यात आपली कधीतरी चूक होऊ शकते. पण आयुष्यात अशाच चुका वारंवार करत बसने शहाणपणाचे नाही.
३)तुमच्याकडून कोणतेच काम नीटपणे पूर्ण होऊ शकत नाही, हे काही चांगले लक्षण नाही. अशावेळी आपल्याला नेमके काय करायचे आहे याचे शांतपणे विचार करा. आपण काम कसे सुरु केले यापेक्षा किती सफाईदारपणे ते पूर्ण केले यावरच आपल्या क्षमतेची चुणूक दिसणार असते. त्यामुळे काम पूर्णत्वास नेणे याला कोणताही पर्याय नाही.
४) तुम्हांला एखादे काम दिलेले आहे म्हणून यंत्रवत बनून ते करू नका. यंत्रवत काम करणे म्हणजे आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे लक्षात घ्या. जीव ओतून काम करा. त्यासाठी तुमचे कौशल्य पणाला लावा.

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.

Leave a Reply