तणाव मुक्त जीवन जगण्याची सोपी सूत्रे

लाइफस्टाइल

आपला दिवस तणावानेच सुरु होतो आणि तणावातच संपतो. या तणावाला कमी करण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न का करू नये, त्यासाठी पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब करा.

तणाव मुक्त जीवन
तणाव मुक्त जीवन
  • नेहमी काम करावे, कामाची चिंता करत बसू नये. कामाची योग्य योजना तयार करावी आणि कामाला सुरवात करावी. एखादे काम पूर्ण होत नसेल तर अधिक प्रयत्न करावेत.
  • न मागता कुणालाही सल्ला देऊ नये, तसेच आपलेच खरे अशा आविभर्वात वागण्याचा प्रयत्न करू नये.
  • मुलांवर अवश्य नजर ठेवावी, परंतु मुलांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये.
  • गरजा कमी कराव्यात आणि कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
  • गरजा कमी कराव्यात आणि कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
  • आजारी पडल्यास औषधे वेळेवर घ्यावीत, तसेच आजारपणाबाबत जास्त चिंता करू नये.
  • मित्र किवां नातेवाईकांवर संकट आल्यास शक्य होईल तेवढी मदत अवश्य करावी. परंतु तुमच्या हातात काहीच नसेल तर केवळ विचार करून त्यामध्ये वेळ घालवू नये.
  • होणारी गोष्ट होतेच आणि न होणारी गोष्ट कितीही प्रयत्न केला तरीदेखील होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. 

Leave a Reply