प्रथिने घ्या, हृदय तंदुरुस्त ठेवा

आरोग्य ज्ञान

प्रथिने घ्या, हृदय तंदुरुस्त ठेवा
हृदय  हा शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव. निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी हृदयाला जपलच पाहिजे. त्यासाठी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास नक्कीच फायदा होतो, अस एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. प्रथिनांमुळे हृदयाचे ठोके नियमित राहण्यात मदत होते. सध्याच्या  ताणतणावाच्या  आयुष्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हृदयाच्या चलनवलनात सर्वात महत्वाची बाब म्हणजे हृदयाचे नियमित पडणारे ठोके. या ठोक्यावर हृदयाची कार्यक्षमता मोजली जाते.

प्रथिने घ्या, हृदय तंदुरुस्त ठेवाप्रथिने घ्या, हृदय तंदुरुस्त ठेवा

हे हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवायचे असल्यास सहा प्रकारच्या प्रथिनांची गरज असते. हृदयाच्या  पेशीं-पेशींमध्ये होणार्या कम्युनिकेशनचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. या पेशींच्या कामात अडथळा निर्माण झाल्यास हृदयाच्या कार्यात मोठी अडचण होते. ही सहा प्रथिने विध्युत कम्युनिकेशनच्या सिग्नलप्रमाणे काम करतात. त्यामुळे त्यांचं  पोषण हृदयाला  मिळत राहिलं तर हृदय  तंदुरुस्त राहायला मदत मिळते

Leave a Reply