घर खरेदी करताना हि दक्षता घ्या

लाइफस्टाइल

जागेची निवड

घर खरेदी करताना सर्वप्रथम चांगल्या लोकेशनचि निवड करण्याला जास्त प्राधान्य देणे गरजेचे असते. आपल्या घरापासून कामाच्या स्थळापर्यंत ये-जा करण्याकरिता ट्रान्सपोर्ट  व्यवस्था कशा प्रकारची आहे, याचा विचार करावा. मुलांचे स्कूल त्या ठिकाणापासून किती दूर अंतरावर आहे? घरापसुन शॉपिंग माल, बाजार, पेट्रोल पंप,बँक, हॉस्पिटल आदि किती अंतरावर आहेत, याचाही विचार करावा.योग्य माहिती- बिल्डरच्या बाबतीत पूर्णपणे माहिती काढावी.

घर खरेदी करताना हि दक्षता घ्यावी
घर खरेदी करताना हि दक्षता घ्यावी

घराचा ताबा देण्याची वेळ

बिल्डर तुम्हाला घराचा ताबा योग्य वेळेवर देईन कि नाही, याची खात्री करून घ्यावी. तुम्ही साईट बघून घ्यावी.  त्यानंतर फ्लॅटचा मेंटनन्स कसा आहे? तेथील स्थानिक लोकांचे या बांधकामाविषयी काय मत आहे? फ्लटमध्ये पुरेशा प्रमाणात प्रकाश, सूर्यकिरणे आणी शुद्ध हवा येईल कि नाही? याचाही विचार करणे आवश्यक असते . तुम्ही वास्तूमध्ये विश्वास ठेवत असाल तर विशेषज्ञाला दाखवून घ्यावे.
त्याशिवाय आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसी बोलावी कि नाही त्यांना कोणत्या फ्लोअरवर राहायला आवडेल? तसे बघता, ग्राउंड फ्लोअर अनेक गोष्टीकरता फायदेशीर असते.
तेथे तुम्हाला अनेक सुविधासोबत काही अतिरिक्त जागा वापरायला मिळते. घर खरेदी करताना नेहमी अशाच जागेची निवड करावी जेथे राहणारे इतर रहिवाशी आणी तुमच्यात  सामाजिक,आर्थिक मेळ बसू शकेल. त्याशिवाय कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याकरिता एखाद्या चांगल्या वकिलाची मदत घ्यावी.

हे ही वाचा : Life Quotes in Hindi

Leave a Reply