सतत दुसऱ्याशी तुलना नको

लाइफस्टाइल

प्रत्येक वेळी तुलना करणेही चांगलेही नाही. म्हणूनच स्वतःला  स्वतःच्या बुद्धीला स्वतःचे वैशिष्ट्य  जपत वाढवा. कुणापेक्षा मोठे वाढावे यासाठी नाही. तुम्ही त्याच्यासारखे होता किंवा त्याच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करता म्हणजे स्वतःतील वैशिष्ट्ये गमावत असता.
फार लांबीची गोष्ट नाही, कोणत्याही विद्यार्थ्याला सत्तर ते ऐशी टक्क्यापर्यंत गुण पडले, तर तो किंवा ती फार हुशार आहे असे कौतुक केले जायचे. आता मात्र नव्वद , अठ्ठयांण्णव टक्के गुण पडले तरी तो किंवा तीच स्वतःच्या स्कोअरवर नाराज असते. अजून थोडे गुण पडले असते तर… याचा विचार येतोच . अशाच पद्धतीने पगाराचा विचार आता होतोय . फार थोड्या  दिवसांपूर्वी म्हणजे आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांना कितीसा पगार होता.


जास्तीतजास्त वीस-पंचवीस हजार किंवा त्याच्या आसपास. तरीही ते आपण सारेच खुश होतो, मात्र, आज लाखात पगार असूनही ‘ दिल मांगे मोअर ‘ अशी  आपली मानसिकता आहे. तसे पाहता या दोनही उदाहरणांमध्ये एक भाग लिहायचा विसरूनच गेला. तो म्हणजे आपण सारेच आपली प्रगती हि कुणीतरी आपल्या जवळचे , मित्र, शेजारी याच्यांशी तुलना करत तेलात असतो. म्हणूनच त्याच्यापेक्षा जास्त …. यासाठी हि सारी धावाधाव करत असतो. तुलना करणेही वाईट नाही. मात्र, प्रत्येकवेळी तुलना करणेही चांगलेही नाही. तुम्ही त्याच्यासारखे होता किंवा त्याच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करता म्हणजे  स्वतःतील वैशिष्ट्य गमावत असता.
म्हणूनच स्वतःला स्वतःच्या बुद्धीला स्वतःचे वैशिष्ट्य जपत वाढवा . कुणापेक्षा मोठे वाढावे यासाठी नाही ; मात्र कुणासाठी काही करावे म्हणून हातून काही व्हावे या हेतूने कार्य करण्यासाठी बुद्धीला तयार करा. सर्वसामान्य असणे हेही चांगलेच असते. कारण, सर्वसामान्यांच्याबरोबर आपल्या बुद्धीची नाळ जोडली तर आपल्या आजूबाजूला मदार करण्यासाठी , मदत देण्यासाठी , तुम्हाला जे काही वाटते ते सांगण्यासाठी  , रडण्यासाठी , हसण्यासाठी, मित्राप्रमाणे खांद्यावर हात  टाकून फिरण्यासाठी कुणीतरी तुमच्यापाशी असतं. तुम्ही इतरांपेक्षा मी माझ्या बुद्धीने वेगळा आहे, तुमच्यापेक्षा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या आसपास दुःखाच्या वा आनंदाच्या क्षणीही  कुणी नसेल. म्हणूनच सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणे हेही थोडके नाही.

Leave a Reply