जीवनाच्या जोडीदाराला काय सांगावे, काय सांगू नये ?

रिलेशनशिप

लग्न  झाल्यानंतर अनेक पती- पत्नीच्या काही गोष्टी अशा असतात कि, ज्या ते आपल्या जीवनसाथीला सांगणेही योग्य समजत नसतात;
 परंतु करू सत्य म्हणे जर पती-पत्नी एकमेकांना शंभर टक्के खरया गोष्टी सांगत राहीले, तर खूपच कमी जोडप्याचे संबंध टिकून राहतील.
 तरीही जीवनसाथीला  जेवढया जास्त गोष्टी सांगायला शिकाल तेवढे त्यांच्यात जास्त सामंजस्य, जवळीक राहील .आपल्या जोडीदाराची गुपिते शोधण्यापूर्वी पती-पत्नींनी सामान्यत; कोणत्या गोष्टी एकमेकांना का सांगत नाहीत हे जाणून घ्यायला हवे. तसा गोष्टी लपवण्यात  पुरुष व स्त्रियांमध्ये खूप फरक असतो.

जीवनाच्या जोडीदाराला काय सांगावे, काय सांगू नये ?
जीवनाच्या जोडीदाराला काय सांगावे, काय सांगू नये ?
  • करिअर -व्यवसाय इ .त ढिलाई केल्याची वा फसल्याची गोष्ट पती-पत्नीला सांगत नाही.
  • आरोग्याच्या बाबतीतही तो  पत्नीला आपण कामासाठी फीत असल्याचे दर्शवित असतो. मद्यपान , धुम्रपान इ.  व्यसनांबाबत  पती पूर्णपणे पत्नीला सांगत नसतात.
  •  इकडे पत्नी स्वत:च्या व मुलांच्या भावी जीवनाबद्दल अत्यंत अत्यंत सावध असते. त्यामुळे भविष्यासाठी केलेल्या छोट्या -मोठ्या बचतीबाबत ती पतीला सांगत नसते.
  •  याचप्रमाणे खर्चाविषयी पती पत्नीला स्पष्ट असे काही सांगत नसते . आपण खरा खर्च सांगितल्यास नक्कीच काही गडबड होईल अशी त्यांना भीती वाटत असते.
  • कमावत्या महिला आपल्या खर्चाप्रमाणेच कमाई विषयीही खरे सांगू शकत नाहीत. विशेषत : ती पतीपेक्षा जास्त कमवत असेल, तर ते पतीला आवडणार नाही अशी भीती त्यांना वाटत असते.

आता जोडीदाराला काय सांगू नये व सांगितले तरी कसे सांगावे ते पाहू या. बरयाचजणांना आपले गुपित जोडीदाराला कसे सांगावे हे समजत नसे. त्यामुळे होता होई तो ते सांगत नसतात. पती वा पत्नीपैकी  एखाद्याला एखादी गुप्त स्फोटक गोष्ट सांगायची  असेल तर घाई  केल्यास मोठे संकट उदभवू शकते.
सांगण्यापूर्वी आपण ती गोष्ट का सांगू इच्छितो याचा विचार करावा. हे सांगून फायदा होईल का तोटा हे स्वत:लाच विचारावे.
माझा जोडीदार हे ऐकून घेऊन मला नित समजून घेऊन समस्या सोडवायला मला मदत करील कि, दु:खी होऊन त्रास करून घेईल याचाही विचार करावा.
काही गुपिते गुपित राहाणेच चांगले असते. विशेषत: लग्नापूर्वीचे विपरीत लिंगी व्यक्तींशी संबंध वा मैत्री अशा गोष्टी जोडीदारापासून लपवून आपण योग्य करीत नाही असे वाटत असले तरी त्या न सांगणेच योग्य असते.
कारण पती-पत्नी  कितीही मुक्त विचारांचे असले तरी लग्नापूर्वीचे वा नंतरचे विवाहबाह्य संबंध स्वीकारू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे दाम्पत्य जीवन उद्धवस्त होऊ शकते.
गुप्त  गोष्टींचा एकमेकांच्या  विरोधार वापर करू नये. त्यामुळेही दाम्पत्य जीवन बिघडू शकते.
त्यापेक्षा गुपित गुपितच ठेवणे हेच सुखी दाम्पत्य जीवनाचे गुपित आहे हे लक्षात ठेवावे.

Leave a Reply