ऐकावे जनाचे, करावे मनाचे

लाइफस्टाइल

जास्तीत जास्त लोक जीवनात अपयशी ठरण्याच मुख्य कारण म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय ते वारंवार बदलतात आपल्या निश्चयाशी ते प्रामाणिक , ठाम राहत नाहीत, शेजाऱ्यांच आपल्याबद्द्लच गॉसिपिंग , लोकांचे टोमणे, त्यांची मत हे लोक फार गंभीरपणे घेतात. दुसऱ्यांच्या मतांनी जे प्रभावित होतात ते फार कमी प्रमाणात यशस्वी होतात. असं म्हटलं जात कि मत वा फुकटचे सल्ले देणं हा या जगातला बिनभांडवली धंदा आहे.

काही लोकांना आपली मत देण्याची खोडच असते मग कुणी त्यांना ती विचारलेली असोत वा नसोत या मतांचा जे आपल्यावर प्रभाव पडून घेतात, ते आपल्या निर्णयाशी कधी ठाम राहू शकत नाहीत.’ ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे आपल्या पूर्वजांनी उगाचच म्हटलं नाहीये.
जर तुम्ही दुसऱ्याच्या टोमण्यांनी विचलित होत असाल, त्यांच्या मतांना अवास्तव महत्व देत असाल तर आयुष्यात तुम्ही तुमची मत बनवू शकणार नाही वा त्यांच्यावर तुमची श्रद्धा बसणार नाही .

ऐकावे जनाचे, करावे मनाचे
ऐकावे जनाचे, करावे मनाचे

तुमचा स्वत:चा खाजगी ग्रुप बनवा, त्यात तुमच्या निर्णयाचा आदर करणारे, तुमच्याबद्दल सहानुभूती असलेले मोजकेच लोक असतील. तुम्ही त्यांच्याशी बोलून अडचणीतून मार्ग काढू शकता. ते तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करतील. पण आपले निर्णय आकाराला करणं टालळ पाहिजे. त्वरित निर्णय घेणारे, त्यांना चिकटून राहणारे, गरज भासलीच तर त्यात सुधारणा करणारे वा बदल करणारे लोक जीवनात यशस्वी होतात.
याउलट निर्णय घ्यायलाच मुळात वेळ लावणारे आणि ते वारंवारबदलणारे लोक जीवनात अपयशी होतात. त्यांचा स्वत:च्या मतांवर विश्वास नसतो .ते आपल्या मतांवर ठाम राहू शकत नाहीत. आपल्या बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नकळत ते दुसऱ्यांना देऊन बसतात.  

Leave a Reply