स्वप्न म्हणजे नेमकं काय ?

लाइफस्टाइल

स्वप्न आहे तरी काय ?

स्वप्न आहे तरी काय ? त्याचा काही अर्थ असतो का ? हा प्रश्न अनेक काळापासून माणसाला सतावत आला आहे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेला आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या स्वप्नांचं महत्व आणि त्याचा अर्थ आता आपण जाणून घेणार आहोत.
स्वप्न आहे तरी काय ? असा प्रश्न अनेक काळापासून मानवाला सतावत असून त्याचा शोध प्रयत्न  प्राचीन काळापासून केला गेला आहे.
मानसशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार झोपेतील मनाच्या अर्धाजागृत अवस्थेला माणसाला विविध प्रकारचे प्राणी तसेच वस्तू दिसतात. स्वप्नाची तुलना हि काही प्रमाणात दिवस्वप्नाशी केली आहे. पण दिवास्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला आपण कोणत स्वप्न पाहात आहोत याची माहिती असते.

स्वप्न म्हणजे नेमकं काय ?
स्वप्न म्हणजे नेमकं काय ?

पण स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला त्याची कल्पना नसते.

प्राचीन काळी स्वप्नांना मोठं महत्व होतं. कारण त्याचा अर्थ लावला जात असे.
स्वप्नातून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न त्याकाळी केला जात असे. मात्र आजच्या काळात तो अंधविश्वास मनाला जातोय.
दिवसभरातील घडामोडींचे स्वप्नांत प्रतिबिंब उमटत असल्याचं मानसोपचार तज्ञांच म्हणणआहे. बाहेरच्या वातावरणाच्या माणसाच्या स्वप्नांवर परिणाम होत असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. एखाद्या झोपी गेलेल्या व्यक्तीच्या पायावर थंड पाणी ओतल्यास त्याला नदीतून चालत असल्याचं किंवा अंघोळ करत असल्याचं स्वप्न पडतं.

झोपेत असताना शरीरावर पडणाऱ्या विविध प्रभावामुळे वेगवेगळ्या प्रकाची स्वप्नं पडतात. आजारपणात पडणाऱ्या स्वप्नांचाही अभ्यास केला गेला आहे. आजारपणात  भयंकर स्वप्नं पडतात, तर सामान्य अवस्थेत चांगली स्वप्नं पडतात. स्वप्नांच्या संशोधनात  सर्वात मोठ योगदान हे सिग्मन फ्राइड  याचं आहे. माणसाचं मन जाणून घेण्यासाठी त्याची स्वप्नं जाणून घेण आवश्यक असल्याचं फ्राइड  यांनी आपल्या अध्ययनातून जगासमोर मांडलं.

हे ही वाचा : Friendship Quotes in Hindi

Leave a Reply