मंगळ दोष असणाऱ्या कन्येचा दोष नष्ट होऊ शकतो

शास्त्र

मंगलदोषाचे निवारण

वराच्या कुंडलीमध्ये असणारा सामान्य मंगळदोष हा त्याच्या पत्नीसाठी घातक ठरतो तर वधुच्या कुंडलीतील सामान्य मंगळदोष हा तिच्या पतीसाठी घातक ठरतो. मंगलदोषाचे निवारण आपोआपही होत असते. त्याची माहिती खालीलप्रमाणे 

वर्तमानकाळात मुलामुलींचा विवाह जमविताना त्यांच्या कुंडली तपासून करण्यात येणारया गुणमेलनामध्ये  मंगळदोष हा फार महत्त्वाचा दोष मानला जातो. कन्येच्या जन्मकुंडलीमध्ये वा चंद्रकुंडलीमध्ये लग्न, चतुर्थ , सप्तम, अष्टम,व द्वादश  या भावांमध्ये स्थित असणारा मंगल हा तिला व तिच्या जीवनसाथीला हानिकारक ठरतो.

वराच्या कुंडलीमध्ये असणारा सामान्य मंगळदोष हा त्याच्या पत्नीसाठी घातक ठरतो तर वधुच्या कुंडलीतील सामान्य मंगळदोष हा तिच्या पतीसाठी घातक ठरतो. ज्योतिषशास्त्रामध्ये  मंगळ , शनीम सुर्य , राहू व केतू हे ग्रह पाप ग्रह मानले जातात. हे सर्व नैसर्गिक रूपाने आपल्या दृष्टीद्वारे वा युतीद्वारे कोणत्याही भावाचे फल नष्ट करतात.

मंगळ, शनी, सुर्य, राहू व केतू हे क्रमाक्रमाने कमी अनिष्टकारी ग्रह आहेत.यातील मंगळ हा सर्वाधिक अनिष्टकारी व केतू हा सर्वात कमी अनिष्टकारी ग्रह आहे.  याप्रकारे लग्न चतुर्थ, सप्तम, अष्टक व द्वादश भावांमध्ये स्थित पापग्रहांमध्ये  मंगळदोषाचा  प्रभाव भावानुसार उत्तरोत्तर कमी कमी होतो. अर्थात सप्तम भावामध्ये हा प्रभाव सर्वाधिक राहतो तर द्वादश भावामध्ये सर्वात कमी .जन्मलग्न, चंद्र राशी व शुक्र राशी यावरून मंगळदोषाचा विचार केला जातो . लग्न आणि शुक्राच्या तुलनेत चंद्रामुळे निर्माण होणारा मंगळदोष हा बराच बलशाली असतो.

मंगळ दोष असणारया कन्येचा दोष नष्ट होऊ शकतो
मंगळ दोष असणारया कन्येचा दोष नष्ट होऊ शकतो

परंतु खालील परिस्थितीमध्ये मंगलदोषाचे निवारण आपोआपही होत असते त्याची माहिती खालीलप्रमाणे
जर वराचा जन्मकालिक  सुर्य, मंगल, शनी, राहू व केतू यातील एखादा पापग्रह जर प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम वा द्वादश भावात असेल तर कन्येचा मंगळदोष आपोआप नष्ट होतो.
याचप्रकारे कन्येच्या एखादा पापग्रह या भावांमध्ये स्थित असेल तर वराचा मंगळदोष आपोआप नष्ट होतो. जर वर वा वधुच्या कुंडलीच्या प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम , वा द्वादश भावामध्ये शनी असेल तर त्याचा तिचा मंगल दोष नष्ट होतो. वरील स्थानामध्ये वक्री, नीचेचा, अस्तंगत वा शत्रुक्षेत्री मंगल असेल किंवा बलवान गुरु, शुक्र हे ग्रह जर लग्न व सप्तम भावामध्ये असतील तरीही मंगळदोष लागत नाही.

ज्या कन्येस मंगळदोष असेल तिचा विवाह जन्मकुंडलीतील सहाव्या भावात मंगल, सातव्यात राहू तसेच आठव्या भावात शनी असणारया वराशी केला असता मंगल दोषाचे निवारण होते. कन्येच्या कुंडलीत वैधव्य योग असेल तर तिचा विवाह विधुर योग असणारया वराबरोबर केला असता, त्यांचे दांपत्य जीवन चिरस्थायी  व सुखमय बनते. अशा मुलीच्या विवाहसमारंभात  तिचा विवाह प्रथम एखाद्या मातीच्या घड्याबरोबर वा विष्णुप्रतीमेबरोबर लावावा व नंतर वराबरोबर . द्वितीय भावामध्ये चंद्र, शुक्र, गुरु, दृष्ट  मंगल, केन्द्रस्थ असेल तरीही मंगळदोष समाप्त होतो.

हे ही वाचा : Friendship Quotes in Hindi

Leave a Reply